शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आज सांगलीत सर्वपक्षीय बंद, रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:55 IST

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला शहरातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कृती समितीच्यावतीने बंद काळात सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकºयांची दौलत सभागृहात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी सकाळी पार पडली. यावेळी ...

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला शहरातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कृती समितीच्यावतीने बंद काळात सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकºयांची दौलत सभागृहात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी सकाळी पार पडली. यावेळी आंदोलनाबाबतचे नियोजन करण्यात आले. सकाळी १0 वाजता स्टेशन चौकात वसंतदादांच्या पुतळ््यास १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर स्टेशन चौकातूनच सर्वपक्षीय व नागरिकांच्या सहभागाने मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड, स्टॅँडमार्गे, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅली छत्रपती शिवाजी पुतळ््याजवळ येऊन सांगता करण्यात येणार आहे.सांगली बंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. रिक्षा बचाव कृती समिती, स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटना, एकता व्यापारी असोसिएशन, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, कापड पेठ व्यापारी संघटना, फेरीवाले संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना, सांगली जिल्हा चालक असोसिएशन, नाभिक संघटना, खाद्य-पेय विक्रेता संघटना, रेशन दुकानदार संघटना, मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन, टिंबर मर्चंट असोसिएशन, गणेश मार्केट विक्रेते संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, मदनभाऊ युवामंच यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय या आंदोलनात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, अवामी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी, स्वाभिमानी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाजवादी पार्टी, राष्टÑविकास सेना, भाकप, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्ष, संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.दुकान सुरू ठेवणाºयांना गुलाब पुष्प‘आज अनिकेत, उद्या आपण’ अशा आशयाचे घोषवाक्य घेऊन पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गांधीगिरीचे दर्शन घडविले जाईल. जे दुकानदार दुकान सुरू ठेवतील, त्यांना समितीच्यावतीने गुलाब पुष्प देऊन त्यांच्यातील भावनाशून्यतेची जाणीव करून देण्यात येईल, असे निमंत्रकांनी सांगितले.